अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या रोड रोमियोवर गुन्हा दाखल

184

भोसरी, दि. ३१ (पीसीबी)- अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिला त्रास देणाऱ्या दोन रोड रोमियोवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.28) मेदनकरवाडी येथे घडला आहे.

याप्रकऱणी मुलीच्या वडिलांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून साहिल किरण वाघमारे (वय अंदाजे 18) व त्याचा साथिदार ऋशिकेष संजय वाघमारे (वय 19) दोघे राहणारे मेदनकरवाडी यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी दहावीत शिकत असून ती 15 वर्षाची आहे. ती तिच्या क्लासेसला जाताना व घरी परत येत असताना आरोपी हे गाडीवरून येवून हॉर्न वाजवत, कॉलर उडवून हाताने इशारे करत व बुलटचे फटाके वाजवून मुलीच्या अंगावर गाडी घातल्यासारखी करत तिला त्रास देत होते. यावरून आरोपीवर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.