सोसायटीधारक राहुल कलाटे यांच्या पाठिशी

0
181

चिंचवड (पीसीबी) । चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना प्रचाराच्या सुरुवातीलाच मतदारांचा पाठिंबा वाढत आहे. वाकड पुनावळे परिसरातील 360 हून अधिक गृहनिर्माण सोसायटीधारकांनी एकमताने उच्चशिक्षित उमेदवार असलेले कलाटे यांना पाठिंबा दिला. चिंचवडच्या विकासासाठी पुढचे आमदार राहुल कलाटे असा निर्धार सोसायटीधारकांनी केला आहे. चिंचवडच्या राजकारणात निर्णायक ठरणारी सोसायटीधारकांची मते कलाटे यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राकेश शेडगे यांनी राजीनामा दिला आहे. कलाटे यांना पाठिंबा दिला. वाकडगावचे ग्रामदैवत म्हातोबाला श्रीफळ वाढवून राहुल कलाटे यांनी रविवारी प्रचाराचा शुभारंभ केला. प्रचार सुरु करताच नागरिकांचा पाठिंबा वाढू लागला असून चिंचवडमध्ये सर्वत्र शिट्टीचा गजर सुरु झाला आहे. मतदारसंघात सर्वत्र शिट्टी वाजताना दिसते. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो. कलाटे यांच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये उत्साह आला आहे. कलाटे यांच्याबाबत मतदारांमध्ये सहानुभूती दिसते.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये 50 हजारहून अधिक मतदार आहेत. सोसायटीतील नागरिक विकासाचे व्हिजन ठेवून काम करणा-या उमेदवारांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहतात. राहुल कलाटे यांनी नगरसेवक, गटनेता असताना वाकड परिसराचा कायापालट केला. सोसायटीधारक हक्काचा व्यक्ती म्हणून कलाटे यांच्याकडे पाहतात. सोसायटीचे कोणतेही काम असल्यास कलाटे मदतीला धावून येतात. त्यामुळेच पोटनिवडणुकीत सोसायटीधारकांनी कलाटे यांना पाठिंबा दिला आहे.

वाकड परिसरातील 360 सोसायट्या, अपार्टमेंटमधील सुमारे 600 हून अधिक प्रमुख पदाधिका-यांनी रविवारी एक बैठक घेतली. पाणी, रस्ते, पायाभूत सुविधा, स्वच्छता, क्रीडांगण, सार्वजनिक वाचनालय, वृक्षारोपण, हिरवळ वाढवणे, नद्या, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय समस्या, सार्वजनिक शाळा, वृक्षारोपण, वाहतूक अशा विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी एका प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. कलाटे यांना विकासाचे व्हिजन आहे. उच्चशिक्षित आहेत. त्यांना प्रश्नांची जाण आहे. प्रश्न तडीस नेण्याची त्यांच्यात धमक आहे. त्यामुळेच कलाटे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सोसायटीधारकांनी सांगितले. सोसायटीधारकांचा पाठिंबा मिळाल्याने कलाटे यांचे मनोबल उंचावले आहे.

राष्ट्रवादी माथाडी कामगार युनियनच्या शहराध्यक्षांचा कलाटे यांना पाठिंबा

दरम्यान, राष्ट्रवादीचे माथाडी कामगार युनियनचे शहराध्यक्ष साकी गायकवाड यांनी राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीकडून कलाटे यांना उमेदवारी मिळेल असे समजून आम्ही काम सुरु केले होते. तरुणवर्गाची तशी भावना होती. परंतु, तसे घडले नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिव-फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीतील तरुणांनी राहुल कलाटे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वजण त्यांचे काम करणार आहोत. कलाटे यांचा प्रचार करण्यासाठी कोणताही अडथळा येवू नये यासाठी राष्ट्रवादीच्या पदाचा गायकवाड यांनी राजीनामा दिला आहे.