मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत अडीच हजार विध्यार्थाचा सहभाग

0
482

यमुनानगर, दि.१४(पीसीबी) – ‘आधी केले मग सांगितले’ या समर्थ वचनाची आठवण
कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांनी अंतर शालेय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेच्या बक्षीस समारंभात करून दिली.
समर्थ भारत अभियान व श्री समर्थ रामदास स्वामी सज्जनगड संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड मध्ये मनाच्या श्लोकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. ह्या स्पर्धांचा आयोजन मकर संक्रांतीनंतर जानेवारी फेब्रुवारी च्या दरम्यान करण्यात आले. पिंपरी चिंचवड मधील २५ पेक्षा जास्त शाळांनी तर अडीच हजार विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. या अडीच हजार विद्यार्थ्यांचे विविध गट करण्यात आले होते व त्या गटानुसार श्लोकांची संख्या ठरवण्यात आमनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत
अडीच हजार विध्यार्थाचा सहभाग
यमुनानगर, दि.१४(पीसीबी) – ‘आधी केले मग सांगितले’ या समर्थ वचनाची आठवण
कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांनी अंतर शालेय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेच्या बक्षीस समारंभात करून दिली.
समर्थ भारत अभियान व श्री समर्थ रामदास स्वामी सज्जनगड संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड मध्ये मनाच्या श्लोकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. ह्या स्पर्धांचा आयोजन मकर संक्रांतीनंतर जानेवारी फेब्रुवारी च्या दरम्यान करण्यात आले. पिंपरी चिंचवड मधील २५ पेक्षा जास्त शाळांनी तर अडीच हजार विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. या अडीच हजार विद्यार्थ्यांचे विविध गट करण्यात आले होते व त्या गटानुसार श्लोकांची संख्या ठरवण्यात आली होती. या वेळेला शिक्षक व पालक असाही वेगळा गट केला होता. जेणेकरून शिक्षक आणि पालक सुद्धा मनाच्या श्लोकांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होतील आणि आपल्या पाल्याला आपल्या विद्यार्थ्याला मनाचे श्लोक म्हणण्यासाठी उत्तेजन देतील हा त्यामागचा उद्देश होता. ह्या स्पर्धांचे निरीक्षण करण्यासाठी २५ ते ३० परीक्षकांनी मदत केली सहभागी शाळांमध्ये वेळोवेळी जाऊन विद्यार्थ्यांच्या कलाने या स्पर्धा पार पडल्या.
स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये ३४० च्या वर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती तर जूनियर सीनियर kg गटामध्ये १७० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या होती. मनाचे श्लोकांच्या स्पर्धांची अंतिम फेरी दिनांक १२ फेब्रुवारी २०२३, रविवारी, विद्यानंद भवन इंग्लिश मीडियम स्कूल निगडी ,येथे सकाळी ८ ते दु. २वाजे दरम्यान पार पडली . अंतिमफेरी चे निकाल व बक्षीस समारंभ मॉडर्न हायस्कूल यमुनानगर येथील प्रांगणात दिनांक १२ फेब्रुवारी २०२३, रविवारी सायंकाळी साडेपाच ते सातच्या दरम्यान करण्यात. आला या कार्यक्रमासाठी कार्पोरेट कीर्तनकार श्री सचिन जी लिमये, यांनी मार्गदर्शन केलं . ते म्हणाले मनाच्या श्लोकांची स्पर्धा म्हणणं गैर आहे आजच्या स्पर्धेच्या युगा, स्पर्धेचं स्वरूप दिल्याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये एखादं ध्येय निश्चित करण्याकरता स्पर्धेचे स्वरूप असलेले संस्कारक्षम कार्यक्रम घेणे आवश्यक आहे. त्यांनी पालकांना विनंती केली की रोज एका ठराविक वेळेला आपल्या मुलाला मुलीला जवळ बसून ठराविक चालीमध्ये मनाचे श्लोक म्हटले तर विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण होईल आणि मुलं जास्तीत जास्त मनाचे श्लोक पाठ करतील आणि केवळ पाठांतर करून चालणार नाही तर जशी मुलं मोठी होतील तशी त्यांना त्याचा अर्थ समजून सांगितला पाहीजे , अर्थ कळला की त्यांच्या जीवनामध्ये खात्रीलायक अमुलाग्र बदल होईल असं ते म्हणाले स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजामध्ये पाच मनाचे श्लोक म्हटले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियाताई जोग यांनी केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजीव नगरकर यांनी मांडले. डॉ.माधवी महाजन यांची उपस्थिती होती.समर्थ भारत अभियान निगडी व श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड यांच्यातर्फे सर्व सहभागी झालेल्या शाळांचे तेथील शिक्षकांचे पालकांचे विद्यानंद भवन इंग्लिश मीडियम स्कूलचे , मॉर्डन हायस्कूलचे समर्थ भारत अभियान मधील सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.ली होती. या वेळेला शिक्षक व पालक असाही वेगळा गट केला होता. जेणेकरून शिक्षक आणि पालक सुद्धा मनाच्या श्लोकांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होतील आणि आपल्या पाल्याला आपल्या विद्यार्थ्याला मनाचे श्लोक म्हणण्यासाठी उत्तेजन देतील हा त्यामागचा उद्देश होता. ह्या स्पर्धांचे निरीक्षण करण्यासाठी २५ ते ३० परीक्षकांनी मदत केली सहभागी शाळांमध्ये वेळोवेळी जाऊन विद्यार्थ्यांच्या कलाने या स्पर्धा पार पडल्या.
स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये ३४० च्या वर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती तर जूनियर सीनियर kg गटामध्ये १७० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या होती. मनाचे श्लोकांच्या स्पर्धांची अंतिम फेरी दिनांक १२ फेब्रुवारी २०२३, रविवारी, विद्यानंद भवन इंग्लिश मीडियम स्कूल निगडी ,येथे सकाळी ८ ते दु. २वाजे दरम्यान पार पडली . अंतिमफेरी चे निकाल व बक्षीस समारंभ मॉडर्न हायस्कूल यमुनानगर येथील प्रांगणात दिनांक १२ फेब्रुवारी २०२३, रविवारी सायंकाळी साडेपाच ते सातच्या दरम्यान करण्यात. आला या कार्यक्रमासाठी कार्पोरेट कीर्तनकार श्री सचिन जी लिमये, यांनी मार्गदर्शन केलं . ते म्हणाले मनाच्या श्लोकांची स्पर्धा म्हणणं गैर आहे आजच्या स्पर्धेच्या युगा, स्पर्धेचं स्वरूप दिल्याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये एखादं ध्येय निश्चित करण्याकरता स्पर्धेचे स्वरूप असलेले संस्कारक्षम कार्यक्रम घेणे आवश्यक आहे. त्यांनी पालकांना विनंती केली की रोज एका ठराविक वेळेला आपल्या मुलाला मुलीला जवळ बसून ठराविक चालीमध्ये मनाचे श्लोक म्हटले तर विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण होईल आणि मुलं जास्तीत जास्त मनाचे श्लोक पाठ करतील आणि केवळ पाठांतर करून चालणार नाही तर जशी मुलं मोठी होतील तशी त्यांना त्याचा अर्थ समजून सांगितला पाहीजे , अर्थ कळला की त्यांच्या जीवनामध्ये खात्रीलायक अमुलाग्र बदल होईल असं ते म्हणाले स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजामध्ये पाच मनाचे श्लोक म्हटले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियाताई जोग यांनी केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजीव नगरकर यांनी मांडले. डॉ.माधवी महाजन यांची उपस्थिती होती.समर्थ भारत अभियान निगडी व श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड यांच्यातर्फे सर्व सहभागी झालेल्या शाळांचे तेथील शिक्षकांचे पालकांचे विद्यानंद भवन इंग्लिश मीडियम स्कूलचे , मॉर्डन हायस्कूलचे समर्थ भारत अभियान मधील सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.