कंपनीतून तीन लाखांचे जॉब पार्टची चोरी

0
235

चाकण, दि. २५ (पीसीबी) – कंपनीतून तीन लाख रुपये किमतीचे ३० जॉब पार्ट दोन चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन ते चार वाजताच्या सुमारास वसुली फाटा येथील मेगाई पीसी प्रोजेक्टस प्रा ली या कंपनीत घडली.

ऐनुल हबीब हारुण इनामदार (वय ३६, रा. चिंचवड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इनामदार हे काम करत असलेल्या कंपनीच्या वॉल कंपाउंड वरून दोन चोरटे आत आले. त्यांनी बाथरूमच्या जवळील ग्रीलच्या दरवाजातून कंपनीत प्रवेश केला. स्टेनलेस स्टीलचे सुमारे १५०० किलोचे एकूण तीन लाख रुपयांचे ३० जॉब पार्ट चोरून नेले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.