Loksabha Election | नागपूर विभागात पहिल्या दोन तासांतच झालं ७.२८ टक्के मतदान

0
35

नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दोन तासांत सरासरी ७.२८ टक्के मतदान पार पडले.  दुपारी उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेता सकाळीच मतदान उरकून घेण्याचा कल मतदारांमध्ये आहे. त्यामुळे बहुसंख्य मतदान केंद्रांमध्ये मतदारांनी गर्दी केली आहे. मतदान शांतपणे सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही अनुचित घटनेची तक्रार झालेली नाही.

सकाळी ९ वाजेपर्यंत नागपूरमध्ये ७.७३, रामटेकमध्ये ५.८२, भंडारा-गोंदियामध्ये  ७.२२, गडचिरोली -चिमूरमध्ये  ८.४३ तर,  चंद्रपूर मतदारसंघात ७.४४ टक्के मतदान झाले.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान
नागपूर -७.७३ टक्के
१) मध्य नागपूर – ५.२० टक्के २) पूर्व नागपूर – ८.०१ टक्के ३) उत्तर नागपूर – ६.८४ टक्के ४) दक्षिण नागपूर – ७.९० टक्के ४)  दक्षिण-पश्चिम नागपूर – १० टक्के ५) पश्चिम नागपूर – ८.१० टक्के

रामटेक – ५.८२ टक्के
१) हिंगणा – ६ टक्के २) कामठी – ६.२० टक्के ३) काटोल – ३ टक्के ४) रामटेक – ६.५५ टक्के ५) सावनेर – ६.१० टक्के ६) उमरेड – ६.५७ टक्के 

“भंडारा/गोंदिया – ७.२२ टक्के
१) अर्जुनी-मोरगाव – १२.३२ टक्के २) भंडारा – ५.७९ टक्के ३) गोंदिया – ६.६७ टक्के ४) साकोली – ६.८० टक्के ५) तिरोडा – ६.९० टक्के ६) तुमसर – ५.९६ टक्के 

चंद्रपूर – ७.४४ टक्के
१) आर्णी – ९.१२ टक्के २) बल्लारपूर – ७.८० टक्के ३) चंद्रपूर – ७ टक्के ४) राजुरा – ६.३० टक्के ५) वणी – ७.४१ टक्के ६) वरोरा – ७.०१ टक्के

 गडचिरोली/चिमूर – ८.४३ टक्के
१) अहेरी – ८.५० टक्के २) आमगाव – १ टक्के ३) आरमोरी – ११ टक्के ४) ब्रह्मपुरी – ९.२० टक्के ५) चिमूर – ८.३६ टक्के ६) गडचिरोली – १२ टक्के”