विभागप्रमुखांनो, बदलीसाठी पात्र अधिकारी, कर्मचा-यांची माहिती पाठवा

0
278

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील गट ‘अ’ ते ‘ड’ मधील एप्रिल महिन्यात बदलीसाठी पात्र ठरणा-या अधिकारी, कर्मचा-यांची यादी पाठवावी. तसेच ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैयक्तीक अथवा वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असेल, असे अर्जही विभागप्रमुखांनी 28 फेब्रुवारी पर्यंत प्रशासन विभागाकडे पाठवावेत. याबाबतचे पत्रक सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी विभागप्रमुखांना पाठविले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण 2011 साली तयार करण्यात आले आहे. एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. या धोरणानुसार बदलीस पात्र ठरणारे तसेच वैयक्‍तिक व वैद्यकीय कारणास्त बदली हवी असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी पाठविण्यात यावी.

28 फेब्रुवारीपर्यंत विभागप्रमुखांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रशासनाकडे यादी पाठवावी. मुदतीनंतर आलेले अर्ज प्रशासन विभागामध्ये स्वीकारले जाणार नाहीत. त्याचबरोबर ज्या अधिकारी, कर्मचा-यांनी बदली मिळण्याबाबतचा विभागामध्ये दाखल केलेला अर्ज संबंधित विभागाने प्रशासनास पाठविला नाही. त्याबाबत तक्रारी दाखल झाल्यास विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची स्पष्ट नोंद घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.