देशाचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात २०१९पेक्षा यंदा एक लाख १४ हजार ७६१ ने मतदान केलेल्यांची संख्या वाढली आहे. ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात पडणार? यावरून खासदार कोण होणार हे चार जूनला ठरणार आहे.
बारामती मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान झाले. मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केली. त्यानुसार लोकसभा मतदारसंघात ५९.५० टक्के मतदान झाले आहे. २०१९मध्ये या मतदारसंघात ६१.७ टक्के मतदान झाले होते. गतवेळेपेक्षा यंदा दीड ते पावणे दोन टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे.
परंतु एक लाख १४ हजार ७६१ने मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २०१९मध्ये १२ लाख ९६ हजार ८६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. यावर्षी संख्या १४ लाख ११ हजार ६२१ पर्यंत वाढली आहे. त्यामध्ये सात लाख ७४ हजार ३८३ म्हणजे ६२.३५ टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले; तर सहा लाख ३७ हजार २१९ म्हणजे ५६.३६ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
बारामती लोकसभेत अंतिम मतदान ५९.५० टक्के ECI नुसार तपशील: बारामती - 69.48% भोर - ६०.१२% दौंड - ६०.२९% इंदापूर - 67.12% खडकवासला - 51.55% पुरंदर - 53.96%