भोसरीतील महासत्संग सोहळ्यात भाविक महिलेचे दागिने पळवले

0
322

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या महासत्संग सोहळ्यात अज्ञातांनी एका महिलेच्या गळ्यातील एक लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. ११) दुपारी दोन वाजता भोसरी जवळील मोशी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मोशी येथे गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या महासत्संग सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. अण्णासाहेब मोरे यांचे दर्शन घेत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञाताने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील ३५ हजारांचे १२.४७० ग्रॅम वजनाचे फॅन्सी मंगळसूत्र आणि एक लाख ३० हजारांचे ४३ ग्रॅम वजनाचे मोठे मंगळसूत्र असे एकूण एक लाख ६५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.