शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांना मातृशोक

0
225

पुणे, दि. २० (पीसीबी) – शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॅा. नीलम गोऱ्हे यांच्या मातोश्री श्रीमती लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे आज (२० फेब्रुवारी) रोजी सोमवारी सकाळी निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. आज सायंकाळी पाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी मॅाडेल कॅालनी येथील त्यांच्या निवासस्थानी दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शानासाठी ठेवण्यात येणार आहे.