सामान्य माणूस हीच आपली खरी शक्ती – अजितदादा पवार

0
527

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – दिनदर्शिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचण्याची संधी असते.त्यामाध्यमातून आपला पक्ष,त्याची ध्येयधोरणे व कार्य कुटुंबातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे यादृष्टीने या दिनदर्शिकेचे विशेष महत्त्व आहे.तसेच सामान्य माणूस हीच आपली शक्ती असून साधेपणा जपत त्यांच्यापर्यंत पोहोचावे असा सल्ला महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.ना.अजितदादा पवार यांनी युवा नेते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ यांना त्यांच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशनप्रसंगी दिला तसेच मकर संक्रांती सणाचे औचित्य साधत या दिनदर्शिकेच्या उत्कृष्ट प्रकाशनबद्दल मा. प्रशांतदादा सपकाळ यांचे कौतुक करत तळागाळापासून समाजसेवा करत राजकारणामध्ये यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला.

तसेच पुढील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करत त्यांचा उत्साह वाढवला.युवा नेतृत्वाला योग्य दिशा व संधी देण्याची दादांची कार्यशैली व पद्धत पाहून खूप शिकायला मिळाले असे प्रशांत सपकाळ यावेळी म्हणाले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ यांच्या दिनदर्शिका २०२३ प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.ना.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी अजितभाऊ गव्हाणे,प्रशांत दादा शितोळे,नाना काटे,बाबुराव चांदेरे,तनपुरे सर आदि मान्यवर उपस्थित होते.