नागपुरात भाजपला मोठा दणका, महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांचा विजय

0
305

नागपूर, दि. २ (पीसीबी) – भाजपचे राज्याचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या मतदारसंघात विरोधकांनी मोठा दणका दिला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाचा निकाल हाती आलेला असून भाजप पुरस्कृत नागो गाणार यांचा पराभव झालेला आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झालेला आहे.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज सकाळी ८ वाजण्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झाली. नागो गाणार हे भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार होते. मागील दोन टर्म गाणार हे आमदार होते. ते हॅटट्रिक करतील, असं सांगितलं जात होतं.

परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झालेले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. नागपूरमधली सहा जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. तब्बल ८६.२६ टक्के मतदान झाले होते.