भाऊसाहेब भोईर आता नाना काटे यांचे प्रचारप्रमुख

0
655

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे यांच्या प्रचार प्रमुखपदी महाविकास आघडीच्यावतीने भाऊसाहेब भोईर यांची निवड करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे यांनी त्याबाबतचे पत्र आज दिले.

चिंचवड पोटनिवडणुकिसाठी इच्छुक उमेदवार म्हणून श्री भोईर हे एक प्रमुख दावेदार होते. गेली ३५ वर्षे राजकारणात सर्वात जेष्ठ आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून कला क्षेत्रात राज्यात त्यांचे नाव आहे.