ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

0
292

आळंदी, दि. २९ (पीसीबी) : पुणे आळंदी या पालखी मार्गावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रीगुरू निवृत्तींनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रा व श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ति प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिना निमित्त अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक मारुती महाराज कुरेकर,नरहरी महाराज चौधरी, उद्योजक विजय जगताप, संजय भिसे, माजी नगरसेवक अप्पा बागल, सुरेश भोईर यांचे हस्ते श्री ज्ञानेश्वरी पूजन, गाथा व विना पूजन करण्यात आले.

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर देवस्थांन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, खजिनदार दत्तात्रय गायकवाड, रमेश महाराज घोगडें, मनोहर भोसले, राजेंद्र नाणेकर यांचे हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ, उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. या कीर्तन सोहळ्यात मृदंगाचार्य आबा गव्हाणे, व्यकटेश फड, सुशील महाराज निगडे, सोमनाथ महाराज भालेराव, गायनाचार्य राधाकृष्ण गरड गुरुजी यांनी सेवा रुजू केली. सोहळ्याची सांगता लक्ष्मण महाराज पाटील यांच्या कीर्तनाने हरिनाम गजरात झाली. यावेळी कीर्तनकार पाटील महाराज यांचा सत्कार पै. किसन लांडगे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर देवस्थांन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील उपस्थित होते.

मंदिर परिसरात सोहळ्याचे काळात अनुष्का केदार हिने रांगोळी काढत भाविकांचे लक्ष वेधले. सोहळ्यात महापूजा, काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्री गाथा भजन, महिला भजनी मंडळाची भजने ,हरिपाठ, हरिकीर्तन व हरी जागर कार्यक्रम उत्साहात झाले. भाविकांना अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आले. मंदिरावर देवस्थान तर्फे पुष्प सजावट व लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली होतो. भाविकांनी दर्शनास मोठ्या संख्येने गर्दी करून श्रींचे दर्शन घेतले.