मुंबई मध्ये पुर्ण हॉस्पिटल केले सील; ३ डॉक्टर, २६ नर्स कोरोना पाॅजीटिव्ह

0
444

मुंबई,दि.६(पीसीबी) – संपूर्ण देशात कोरोना वायरसचा प्रकोप झपाट्याने वाढत आहे. मुंबई स्थित एका हॉस्पिटल मध्ये

डॉक्टर्स व नर्स कोरोना बाधित झाल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहे आहेत व संपूर्ण हॉस्पिटलला सील करण्यात आले आहे.

मुंबई येथिल वॉकहार्ट हॉस्पिटल मध्ये २६ नर्स और ३ डॉक्टर्स कोरोना बाधीत असल्याची बाब समोर आली आहे. या घटनेनंतर मुंबई मनपाने हे संपूर्ण हॉस्पिटल सील केले आहे. याठिकाणी काही महत्वूपर्ण टीमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकनी यांनी दिलेल्या माहितीनुसार एग्जिक्युटिव हेल्थ ऑफिसर च्या अध्यक्षतेखाली एक चौकशी सनितीचे गठन करण्यात आले आहे. हॉस्पिटल मध्ये इतकी चोख व्यवस्था असताना वायरस चा प्रसार कसा झाला याची चौकशी समिती मार्फत केली जाणार आहे. कोरोना चे संक्रमणाचे अनेक प्रकरणे समोर आल्यानंतरही हॉस्पिटल चे सुमारे २७० कर्मचारियों व पेशंट्सचे सॅम्पल्स टेस्ट साठी पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, प्रकरणातले गांभीर्य लक्षात घेऊन ज्या नर्सेस टेस्ट मध्ये पॉजिटिव अढळलले आहेत त्यांना विले पार्ले स्थित क्वार्टर्स मधुन हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.