अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मिडीयावर व्हायर करण्याची धमकी

0
588

उत्तर प्रदेश, दि, ९ (पीसीबी) – प्रणयाच्या क्षणांचा व्हिडिओ बनवणाऱ्या पती विरोधात पत्नीनेच बारादारी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.  उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये हे जोडपे एकत्र राहायचे. मी असा व्हिडिओ बनवायला विरोध केला तेव्हा पतीने मला व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन दिले पण नंतर पतीने त्याच व्हिडिओवरुन माझी ब्लॅकमेलिंग सुरु केली. सतत मला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली जायची असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी पतीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार महिलेचा २९ ऑक्टोंबर २०१८ रोजी विवाह झाला. त्यानंतर नवऱ्याने दोघांच्या शारीरिक संबंधांचे त्याच्या मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. जेव्हा पत्नीने आक्षेप घेतला तेव्हा पतीने व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन दिले होते. पण काही दिवसांनी तिला पतीच्या फोनमध्ये ते व्हिडिओ आढळले. त्यावेळी तिने ते व्हिडिओ डिलीट केले.

त्यानंतर नवऱ्याने पुन्हा लैंगिक संबंधांची जबरदस्ती केली व व्हिडिओ बनवला. आणखी काही वेळा अशाच प्रकारे तिच्यावर लैंगिक जबरदस्ती करण्यात आली. जेव्हा तिने याबद्दल सासू-सासऱ्यांकडे दाद मागितली तेव्हा त्यांनी आपल्या मुलाची बाजू घेतली. नवरा सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत असल्यामुळे तिने आपल्या आई-वडिलांना याबद्दल काही सांगितले नाही. ३० जूनला जेव्हा तिला पतीने मारहाण केली तेव्हा ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली व सात जुलैला बारादारी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलीस या प्रकरणी तपास करत असून त्यांनी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही.