प्लास्टिक फुले,हार,तुरे विक्रीला बंदीकठोर अमलबजावणीची मागणी

bpcauthor
1 Min Read

राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी फुलोउत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक लाभासाठी व पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले.अधिवेशनात सण व उत्सवात प्लास्टिक फुले,हार,तुरे,हे वापरण्यास व विक्री करणाऱ्या वर बंदी आणली.विधानसभेत तसा कायदा एकमताने मंजूर करण्यात आला.त्यासाठी शिक्षेची तरतूद केली व जि.आर,सुध्दा काढला. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी फ्लॉवर असोसिएशन चे अध्यक्ष पंढरीनाथ म्हस्के यांनी केली आहे.
प्रसिद्धी पत्रात ते म्हणतात,
नुसतं डॉल्बि मुळें पर्यावरणाचा -हास होत नाही तर अशा वस्तू मुळे सुध्दा नुकसान होत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र अशी दुकाने विक्री साठी सजलेली आहेत.परतु आमच्या महापालिका प्रशासनाला व जिल्हा प्रशासनाला मुख्यमत्रीयानी केलेल्या कायद्यांची माहिती दिसतं नाही. एक नागरिक म्हणुन विनंती प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी. नाहीतर गुठका बंदी, प्लास्टिक carry बॅग बंदी सारखीच वसुलीचा नवा मार्ग म्हणुन संधी. शासनाने ते प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन अंमलबजावणीसाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी इंडिया Florist असोसिएशन चे महाराष्ट्र प्रमुख म्हणुन मी पंढरीनाथ म्हसके करीत आहे. अन्यथा हे सरकार पूतना मावशी चा नवा अवतार आहे का? असे म्हणावेसे वाटते.

Share This Article