भोपाल, दि. ३ : मध्य प्रदेशच्या नगरविकास व गृहनिर्माण विभागाने राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ अंतर्गत सायबर सुरक्षा श्रेणीत प्रतिष्ठेचा रौप्य पुरस्कार पटकाविला आहे. या कामगिरीमुळे राज्याच्या डिजिटल प्रशासनाला राष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे.
भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व लोक तक्रार विभागातर्फे जयपूर येथे आयोजित २९ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगरविकास व गृहनिर्माण विभागाच्या वतीने आयुक्त संकेत भोंडवे यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.
सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात राबविण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजना, ई-गव्हर्नन्स प्रणाली अधिक सुरक्षित व सक्षम करण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच नागरिकाभिमुख डिजिटल सेवा यांची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय स्तरावरील या सन्मानामुळे मध्य प्रदेशच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमांना नवी ओळख मिळाली असून, आयुक्त संकेत भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने केलेल्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
मध्य प्रदेशमध्ये अव्वल ई-गव्हर्नन्ससंकेत भोंडवे यांनी स्वीकारला पुरस्कार

