सरकार सेतू पुलावरील रोषणाई व सुशोभीकरण, २२ कोटीच्या कामाची चौकशी करा- भाऊसाहेब भोईर

bpcauthor
1 Min Read

चिंचवड, दि. २९ सांगवी येथील सरकार सेतू पुलावरील रोषणाई व सुशोभीकरण कामात आर्थिक अनियमितता झाल्याची शक्यता व्यक्त करत विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक चौकशीची मागणी केली आहे.

स्थापत्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार या कामावर सुमारे २२ कोटी रुपये खर्च झाल्याचे नमूद आहे. मात्र प्रत्यक्ष पुलावरील एमएस साहित्याचे प्रमाण व इतर कामांचा विचार करता संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे ५ कोटी रुपयांपर्यंतच अपेक्षित असल्याचा दावा भोईर यांनी केला आहे. त्यामुळे उर्वरित सुमारे १७ कोटी रुपयांच्या खर्चाबाबत गंभीर शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक समितीकडून प्रत्यक्ष पाहणी, साहित्य पडताळणी, आर्थिक लेखापरीक्षण तसेच अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (एमबी), बिले, देयके आणि मंजुरी आदेशांची सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सार्वजनिक निधीशी संबंधित या प्रकरणात तातडीने चौकशीचे आदेश देण्याची विनंतीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Share This Article