गरोदर महिलांना त्या हिरव्या रंगाचं द्रव्य देऊन अशोक खरात करायचा अत्याचार…हिरव्या द्रव्याने गूढ वाढवलं!

0
2

दि.१३(पीसीबी)-दैवी शक्ती आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोककुमार खरात उर्फ ‘कॅप्टन’ प्रकरणात आणखी एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. एसआयटीने त्याच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ कार्यालयावर टाकलेल्या झडतीदरम्यान हिरव्या रंगाचे संशयास्पद द्रव्य जप्त केले आहे.

तपास यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हे द्रव्य महिलांना गुंगी आणण्यासाठी किंवा त्यांच्यावर मानसिक नियंत्रण मिळवण्यासाठी वापरले जात असावे. या द्रव्याचे नमुने फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, खरातचा एक पेनड्राइव्हही एसआयटीच्या हाती लागला असून, हे दोन्ही पुरावे त्याच्याविरोधातील केस अधिक मजबूत करू शकतात.

खरातची पोलीस कोठडी आज संपत असून, त्याला न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात येणार आहे. एसआयटीकडून पुढील तपासासाठी पुन्हा कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत खरातविरोधात लैंगिक शोषण, खंडणी, सावकारी आणि फसवणुकीसह एकूण १४ गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, सात महिन्यांच्या गरोदर महिलेवरील अत्याचाराचा गंभीर आरोपही त्याच्यावर आहे.

या प्रकरणातील साक्षीदार आणि संबंधितांची चौकशी पूर्ण झाली असून, तपासाचा सविस्तर अहवाल आज न्यायालयात सादर होणार आहे. आता न्यायालयीन सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.