यवतमाळ जिल्ह्यात पाच वर्षात भोंदूगिरीतील 19 प्रकरणात 59 जणांवर कारवाई

1 Min Read

भोंदूबाबा अशोक खरात यांचे महाराष्ट्रात गाजत चांगलेच गाजत आहे. भोंदूबाबांचे नवनवे प्रकरण उजेडात येत आहे.महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा 2013मध्ये लागू करण्यात आला.

असे असताना असे भोंदूगिरीचे प्रकार घडतच आहे. यवतमाळ जिल्ह्यात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचे प्रकार उघडकीस आले. भोंदूबाबा आणि मांत्रिकांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक, तसेच महिलांच्या शारीरिक शोषणाच्या घटनां घडल्या. गेल्या 5 वर्षांत जिल्ह्यात 19 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंदवले गेले असून 59 आरोपींना अटक करण्यात आली असून यावर कारवाई सूर आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर सुशिक्षित समाजातही भोंदूबाबांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती वाढताना दिसत आहे.
नागरिकांना असे काही आढल्यास थेट पोलिसांशि संपर्क साधावा असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी केले.

Share This Article