पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण, आजचा 10 ग्रॅमचा भाव किती?

1 Min Read

दि.२६(पीसीबी)-मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा भडका संपूर्ण जगात पाहायला मिळाला. या युद्धाचा मोठा परिणाम सोने आणि चांदीच्या भावावर देखील होताना दिसत आहे. पण आता हे युद्ध थांबवण्याच्या मार्गावर असल्यामुळे पुन्हा सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती जाणून घ्या…

आज 26 मार्च रोजी तब्बल सोन्याच्या दरात 2 हजार 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे.26 मार्च रोजी 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 47 हजार 290 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 42 हजार 50 रुपयांवर पोहोचले आहेत.

Share This Article