रील स्टार अरुण तुपेराहत्या घरी मृतावस्थेत

bpcauthor bpcauthor
1 Min Read

छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध सोशल मीडिया रील स्टार अरुण तुपे यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी (10 मार्च) सकाळी ते त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरही शोककळा पसरली असून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील बालाजी नगर परिसरातील घरात ते अत्यवस्थ अवस्थेत आढळले. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करण्यास सुरुवात केली.

Share This Article