पीएमआरडीए वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यपदी सुरेश दिनकर वाडकर यांची नियुक्ती

1 Min Read

दि.०९(पीसीबी)– पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सदस्य म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुरेश दिनकर वाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमआरडीए आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी नुकतेच वाडकर यांना नियक्तीचे पत्र दिले.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अंतर्गत पीएमआरडीए कार्यालयासाठी वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने निगडी येथील या विषयातील तज्ञ व अनुभवी कार्यकर्ते म्हणून वाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत श्री. वाडकर यांनी २००२ ते २००७ आणि पुन्हा २०१७ ते २०२२ या कालावधीत उद्यान विभागांतर्गत वृक्ष प्राधिकरण समितीत सदस्य म्हणून प्रदीर्घ काळ लक्षवेधी काम केले आहे. पुणे विभाग रल्वे सल्लागार समिती सदस्य म्हणून सलग पाच वर्षे त्यांनी काम केले आहे.

Share This Article