राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा

1 Min Read

दि.२३(पीसीबी)-राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लव्ह जिहाद विरोधी कायद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी महायुती सरकाकडून हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याच अधिवेशनात राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा अशी हिंदू संघटनांची मागणी आहे, या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. हिदुत्ववादी संघटनेच्या मागणीची दखल घेत सरकारी पातळीवर कायदा करण्यासाठी लवकरच कायदे तज्ज्ञाची बैठक होण्याची शक्यता आहे. गुजरातनंतर आता महाराष्ट्रात देखील लव्ह जिहाद विरोधी कायदा येण्याची शक्यता आहे.

Share This Article