रोहित पवार यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोनवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग

0
2

रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून मोठे दावे केले आहेत. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकांचे पुरावे आपल्या मोबाईलमध्ये असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. या पुराव्यांमध्ये मेसेजेस, व्हिडिओ आणि फोनवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग समाविष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. “आम्ही एनडीएबरोबर जायचे की अजित पवार बाहेर येऊन आमच्यासोबत रस्त्यावरची लढाई लढणार हे ठरले होते,” असे विधान करून रोहित पवार यांनी राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

अजित पवार गटाकडून विलीनीकरणाचा विषय थांबल्याचे आणि कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगण्यात आले आहे. सुनील तटकरे यांनीही आमदारांना विलीनीकरणावर बोलू नये, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, रोहित पवार यांनी अजित पवारांच्या भेटीगाठींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जयंत पाटील यांच्या घरातील सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केली आहे. त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.