पवारांच्या नातजावयाची सोयरिक फडणवीस-गडकरींच्या मध्यस्थिने

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि.१०(पीसीबी)-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. नागपूरचे उद्योजक सारंग अरुण लखानी यांच्यासोबत त्यांचा विवाह निश्चित झाला असून, या नातेसंबंधासाठी राजकीय पातळीवरही महत्त्वाची मध्यस्थी झाल्याचे सांगितले जात आहे.रेवती सुळे आणि सारंग अरुण लखानी यांच्या विवाहाची माहिती सुशील कुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली. या पोस्टनंतर पवार कुटुंबातील आनंदाची बातमी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. नागपूरचे रहिवासी असलेले सारंग लखानी यांच्याशी विवाह ठरल्यामुळे रेवती सुळे नागपूरची सून होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हा विवाह जुळून आला आहे. राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या पुढाकारामुळे हा संबंध निश्चित झाल्याचे सांगितले जात असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार यांचे होणारे नातजावई असलेले सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुप चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. उद्योग क्षेत्रात सक्रिय असण्यासोबतच सारंग लखानी हे कुशल बॅडमिंटनपटू म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.

रेवती सुळे या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या कन्या असून, त्यांना विजय सुळे नावाचा भाऊ आहे. रेवती यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रथमच आपल्या आईसाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांची ओळख केवळ राजकीय घराण्याची कन्या म्हणून नव्हे तर शिक्षित आणि सक्रिय युवा चेहरा म्हणूनही निर्माण झाली आहे.

Share This Article