पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्राद्वारे नावाची घोषणा करूनही, विजय उर्फ शीतल गोरख शिंदे यांनी उपमहापौर पद स्वीकारण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. “मला कोणतेही पद नको, मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेन,” अशी भूमिका घेत ते पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतून नाराज होऊन बाहेर पडले. दरम्यान, उमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांना आयत्यावेळी संधी देण्यात आली असून राष्ट्रवादीकडून वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज दाखळ केला आहे.
महापालिकेत १२८ मध्ये भाजपचे ८४, राष्ट्रवादीचे ३७, शिवसेना ६ असे संख्याबळ आहे,
शीतल शिंदे हे महापौर पदासाठी इच्छुक होते. मात्र, भाजपने रवी लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे आणि शिंदे यांना उपमहापौर पद दिल्याने ते नाराज झाले असल्याची जोरदार चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षांचे पत्र जिल्हाध्यक्षांकडे पोहोचल्यानंतर, शीतल शिंदे यांनी पद स्वीकारण्यास नकार देऊन ‘सामान्य कार्यकर्ता’ म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोर आता मोठा पेच निर्माण झाला आहे.
प्रदेशाध्यक्षांनी अधिकृत पत्रात शीतल शिंदे यांचे नाव उपमहापौर म्हणून निश्चित केले होते. नकाराच्या भूमिकेनंतर पक्षाने प्राधिकरणातून दुसऱ्यांदा विजयी झालेल्या शर्मिला बाबार यांना संधी दिली.
उपमाहापौैर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून काळभोरनगर, मोहननगरच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.












































