भाजपचे टार्गेट आता आदित्य ठाकरे, ईडी च्या कारवाईने सुरवात

PCB Admin
2 Min Read

– डिनो मोरिया यांची आधीच दोन वेळा चौकशी
दि . ७ ( पीसीबी ) – बॉलीवूड अभिनेता डिनो मोरिया सध्या त्यांचा नवीन मल्टीस्टारर चित्रपट ‘हाऊसफुल 5’ मुळे चर्चेत आहेत. मात्र, त्याचा सिनेमा रिलीज झालेला असतानाच डिनो मोरियाची मिठी नदीच्या घोटाळा प्रकरणात चौकशी सुरु होती. मात्र, आता या प्रकरणात ईडीने एन्ट्री घेतली आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावर बोट ठेवत भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

अभिनेता डिनो मोरिया प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला टार्गेट केलंय. उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो, अस म्हणत मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेचे संकेत दिलेत. डिनो मोरिया प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि एकंदरीत या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच एकत्रीकरणाची चर्चा असल्याचही राणे म्हणाले. डिनो मोरिया प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो, अशी माहिती असल्याचा मोठा दावा नितेश राणेंनी केला. डिनो मोरिया कोणासोबत बसायचा, कोणासोबत भावनिक आणि शारीरिक संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत असल्याचही त्यांनी सांगितलं. राणे यांच्या आरोपाला आता ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याचा चर्चेची नितेश राणेंनी तुळजापुरात खिल्ली उडवली. आम्हाला झोप लागत नाही, एकाकडे वीस आमदार आणि एकाकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत. आम्हाला घाम फुटला आहे, अशा शब्दात नितेश राणेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली. तसेच हिंदुत्व सोडल्यामुळेच ठाकरे ब्रँड बुडाल्याचा नितेश राणे यांनी ठाकरेंना टोला लगावला. नितेश राणे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या डिनो मोरिया यांची यापूर्वीच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दोन वेळा चौकशी केली होती. आता ED छाप्यादरम्यान हस्तगत करण्यात आलेल्या आर्थिक कागदपत्रे आणि इतर पुरावे तपासत आहे, जेणेकरून हा घोटाळ्यात कोण सामील आहे हे समोर यावे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत करण्यात आली आहे.

Share This Article