विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी ५ कोटींचा मलिदा

0
10

दि . २२ ( पीसीबी ) – धुळ्यात शासकीय विश्रामगृहात एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. गुरुवारी पहाटे चार वाजता या रक्कमेची मोजणी संपली. विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी ही रक्कम जमा केल्याचा आरोप शिवसेना उबाठा नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. या संदर्भात शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी शासकीय विश्रामगृहात धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले, असा आरोप संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. या संदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ते त्या खोलीबाहेर ठिय्या लावून बसले होते. अधिकाऱ्यांनी ही रक्कम आमदारांच्या समितीला देण्यासाठी जमा केल्याचा आरोप आमदार गोटे यांनी केला होता. त्यासंदर्भात शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी एकामागे एक दोन ट्विट केले आहे.
महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे? असा प्रश्न करत संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, धुळे विश्राम गृहात राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती. बुधवारी संध्याकाळी अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले. खोलीत किमान ५ कोटी रुपये आहेत.

या ट्विटनंतर संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले की, आत्ताची ताजी खबर, विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती धुळे जिल्हा दौऱ्यावर आहे. या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथील रूम नंबर 102 मध्ये जमा करण्यात आले होते. विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार, त्यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरता या आमदारांना हा मलिदा देण्यात येत होता. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत! उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले? हा असा महाराष्ट्र लुटण्यासाठीच!

धुळ्यात शासकीय विश्रामगृहात एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. गुरुवारी पहाटे चार वाजता या रक्कमेची मोजणी संपली. विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी ही रक्कम जमा केल्याचा आरोप शिवसेना उबाठा नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. या संदर्भात शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी शासकीय विश्रामगृहात धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले, असा आरोप संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. या संदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ते त्या खोलीबाहेर ठिय्या लावून बसले होते. अधिकाऱ्यांनी ही रक्कम आमदारांच्या समितीला देण्यासाठी जमा केल्याचा आरोप आमदार गोटे यांनी केला होता. त्यासंदर्भात शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी एकामागे एक दोन ट्विट केले आहे.

संजय राऊत यांनी काय म्हटले?