युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा

0
4

मुंबई, दि. ४ : शिवसेना ठाकरे गटातील युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खिचडी घोटाळ्यात ईडीनं त्यांना अटक केली होती. त्यांना आता मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. खिचडी घोटाळ्यातील आरोपी सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 1 लाखाच्या रोख मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाणांना अटक करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळातील या घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. महानगर पालिकेला खिचडीचं कंत्राट पुरवताना पॅकेटमध्ये ठरल्यापेक्षा कमी खिचडी भरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता.

वर्षभराच्या कैदेनंतर हायकोर्टाकडून 1 लाखांचा जामीन मंजूर
शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना अखेर हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. वर्षभराच्या कारावासानंतर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण जेलमधून बाहेर येतील. सूरज चव्हाण यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठपुढे सुनावणी झाली होती. ज्यात तथ्य आढळल्यानं हायकोर्टानं सूरज चव्हाण यांना एक लाखाच्या रोख बाँडवर सुटका करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीनं सूरज चव्हाण यांना अटक केली असून 17 जानेवारी 2024 रोज अटक केली होती.

खिचडी घोटाळ्याची ईडीकडून चौकशी
कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सूरज चव्हाण आणि अमोल किर्तिकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली. आया प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडे असून अमोल कीर्तीकर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

किरीट सोमय्या यांनी केले होते आरोप
कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

खिचडी घोटाळा नेमका काय?
कोरोना काळामध्ये स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, आणि ज्या लोकांचे मुंबईमध्ये घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या ठाकरेंच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दर्शवला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली होती. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आलं होतं.

आदित्य ठाकरेंचे राईट हँड सूरज चव्हाण
आदित्य ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे असणारे आणि त्यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखणारे सूरज चव्हाण कायम पडद्यामागेच राहिले. मुंबईतील कथित कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडी कारवाई सुरू झाली आणि सूरज चव्हाण यांचं नाव चांगलंच चर्चेत आलं. एका वर्षापासून सूरज चव्हाण यांच्यामागे ईडीची पीडा आहे. त्यानंतर आज अखेर त्यांना जामीन देण्यात येत आहे. सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरेंसोबत युवासेनेसाठी खूप काम केलं असल्याचं सांगितलं जातं. सूरज चव्हाण यांचा राजकीय प्रवास एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून झाली. युवासेनेचा साधारण कार्यकर्ता, आदित्य ठाकरेंचा विश्वासू आणि पुढे जाऊन ठाकरे गटाचे सचिव अशी सूरज चव्हाण यांचा राजकीय प्रवास.