गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक

0
5

पिंपरी, दि. १० –
गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ९) दुपारी दिघी येथील गजानन मंदिराच्या समोर करण्यात आली.

गौरव यशवंत नवले (वय २१, रा. श्रीगोंदा अहमदनगर), महेश भाऊसाहेब आढाव (वय २१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह विकी खंडागळे उर्फ टकले (रा. अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक विजय दिपक दौंडकर यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथील गजानन मंदिराच्या समोर काहीजणांनी गांजा आणला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका दुचाकीसह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ किलो ४१० ग्रॅम गांजा, दोन मोबाईल व एक दुचाकी असा ३ लाख ९० हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दिघी पोलिस तपास करीत आहेत.