पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

1 Min Read

पिंपरी, दि. १० –
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. ९) सांगवी आणि बावधन येथे करण्यात आली.

रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय २३, रा. प्रियदर्शनीनगर, जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अमंलदार प्रवीण दौलत पाटील यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जुनी सांगवी येथील गणपती विसर्जन घाटावर एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रोहितला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे पिस्तूल व २ हजार रुपयांचे एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.

दुसऱ्या कारवाईमध्ये केशव त्रिंबक काळे (वय २४, रा. हिवरे, भोजेवाडीता, बीड) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस नाईक तौसिफ सिराज महात यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी केशव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे पिस्तूल. एक जीवंत काडतुस, एक पाच लाख रुपयांची कार, ९० हजार रुपये रोख असा ६ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Share This Article