कतरिना कैफ साईबाबा चरणी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

मुंबई, दि. 16 (पीसीबी) : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.सिनेमाला यश मिळाला यासाठी विकी कौशलची पत्नी कतरिना कैफ हिनं शिर्डीत साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतलं.

पती विकी कौशल याचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत ‘छावा हा हिंदी चित्रपट काही दिवसातच प्रदर्शित होणार आहे. कैतरीना हिनं साई समाधीचं दर्शन घेत चित्रपटाला यश मिळावं यासाठी प्रार्थना केली. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं कैतरीना कैफचा सत्कार करण्यात आला. साई मंदिरा बाहेर पडताना प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीनी कतरिना सोबत कैफ संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र कतरिनानं माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही.

कतरिना कैफ साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी कतरिनाची सासू म्हणजेच विकी कौशलची आई देखील उपस्थिती होती. दोघींनीही छावा सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना केली.

दरम्यान, विकीच्या‘छावा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात विकी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. शिवछत्रपतींनंतर स्वराज्यरक्षणासाठी शंभूराजांनी केलेली कामगिरी, त्यांचं शौर्य, विविध आघाड्यांवर दिलेला लढा आणि बलिदान या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचीही मुख्य भूमिका आहे. ती महाराणी येसूबाईसाहेबाची भूमिका साकारत आहे.

Share This Article