बॅक बेंचर विद्यार्थी बनणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री; शिक्षक म्हणतात….

0
41

मुंबई, दि. 05 (पीसीबी) : महाराष्ट्र राज्याच नेतृत्व पुन्हा एकदा राज्यातील भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असणार आहे. आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या शिक्षिकेने त्यांच्या शाळेतल्या आठवणींना उजाळा दिलाय. देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय जीवनाव्यतिरिक्त त्यांचे काही माहित नसलेले किस्से सांगितले. देवेंद्र फडणवीस हे एक संवेदनशील, विनम्र आणि नेहमी दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारे विद्यार्थी होते. त्यांची राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी होती. पण त्याची त्यांनी कधी घमेंड दाखवली नाही असं त्यांच्या शिक्षिक सांगतात.

सहावेळा आमदार आणि नागपूरचे सर्वात तरुण महापौर राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं शंकर नगर येथील सरस्वती विद्यालयातून शालेय शिक्षण झालं. आठवी ते 10 वी पर्यंत त्यांच्या शिक्षिका राहिलेल्या सावित्री सुब्रमण्यम यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शाळेतल्या आठवणी सांगितल्या. वर्गातील उंच विद्यार्थी असल्याने देवेंद्र फडणवीस नेहमी शाळेत शेवटच्या बेंचवर बसायचे.

सावित्री सुब्रमण्यम यांच्यानुसार अभ्यासात फडणवीस सामान्य होते. पण त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. ते खूप विनम्र, हसमुख आणि संवेदनशील विद्यार्थी होते. “फडणवीस वर्गात सर्व उंच असल्यामुळे ते इतर विद्यार्थ्यांसोबत मागच्या बेंचवर बसायचे. ते खूप संवेदनशील होते. गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीला नेहमी धावून जायचे” असं सावित्री सुब्रमण्यम यांनी सांगितलं.

शिक्षिका सावित्री सुब्रमण्यम म्हणाल्या की, “देवेंद्र फडणवीस यांच्या वर्गात एक पोलियोग्रस्त विद्यार्थी होता. त्याला वर्गात चालता-फिरताना इतरांची मदत लागायची. त्यावेळी इतर विद्यार्थ्यांसोबत फडणवीस सुद्धा त्या मुलाची मदत करायचे” “मला कधी असं वाटलं नव्हतं की, देवेंद्र फडणवीस इतके चांगले वक्ते बनतील. कारण शाळेत असताना त्यांनी कधी स्टेजवर येऊन भाषण केलं नाही” असं सावित्री सुब्रमण्यम म्हणाल्या

बुधवारी देवेंद्र फडणवीस यांची सर्वसम्मतीने महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार आहेत. आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी जोरदार तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री म्हणून 2014 ते 2019 हा त्यांनी पहिला कार्यकाळ पूर्ण केला. नोव्हेंबर 2019 मध्ये दुसरा कार्यकाळ फक्त 80 तासांचा होता