हिंदु जनजागृती समितीचा अनोखा उपक्रम !

bpcauthor bpcauthor
1 Min Read

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’!

पुणे, दि. १६ (पीसीबी) – त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात आणि घरांमध्ये दिवे लावून हिंदु बांधवांनी यावर्षीही दीपोत्सव साजरा केला. या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये स्थित त्रिपुर (दीपमाळ) प्रज्वलित केले गेले. यंदाच्या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदु राष्ट्राचा संकल्प करण्यासाठी ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ हा उपक्रम हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात राबवून जनजागृती करण्यात आली. पुणे शहर भाग, तसेच समितीच्या हिवरे शाखा, वाघळवाडी शाखा, सोमेश्वर शाखा, पिंपळखुटे खळवडी शाखा नवलेवाडी आणि मुरुम येथे मंदिरांमध्ये दिपोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी उपस्थित महिलांनी सामूहिक नामजप केला अन् त्या माध्यमातून त्यांना आनंद मिळाला.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, त्या प्रित्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. आसुरी शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून तो भारतातील बर्‍याच ठिकाणी मंदिरांतून साजरा केला जातो. सध्या समाजात असलेल्या अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करून लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र यावे या उदात्त हेतूने 'एक दीप हिंदु राष्ट्रासाठी' या उपक्रमातून समाजामध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या हिंदु धर्मप्रेमींनी मंदिरे, घरी आदी ठिकाणी दीप प्रज्वलित करताना 'एक दीप हिंदु राष्ट्रासाठी' याविषयीचे फलक हातात धरून लोकांचे प्रबोधन केले. काही ठिकाणी सामूहिक दीपपूजन करताना हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात आली. सोशल मीडियातही हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला.
Share This Article