महाविकास आघाडीत काडिमोड, समाजवादी पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत

PCB Admin
2 Min Read

मुंबई, दि. 25 (पीसीबी) : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. “महाविकास आघाडीच्या जागावाटपात होत असणारा उशिर हा चुकीचा आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप उद्यापर्यंत जाहीर झालं नाही तर समाजवादी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार. समाजवादी पक्षाचे 5 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आम्हाला 5 जागा मिळाव्यात ही विनंती मी शरद पवारांकडे केली. आम्हाला तितक्या जागा न मिळाल्याल आम्ही 25 जागांवर स्वातंत्र्य लढणार”, अशी घोषणा अबू आझमी यांनी केली. “मी पाच उमेदवार दिले आहेत. मी वाट बघू शकत नाही. सरकार बनवायचं आहे. मात्र फार वेळ जात आहे. ही खूप मोठी चूक आहे. लोक या ठिकाणी अजून उभे आहेत. माझे 25 उमेदवार आहेत. मला यांनी सांगावे. नाहीतर मी लढतो. मविआच्या नेत्यांनी उत्तर द्यावे. कारण शेवटी हे लोक धोका देतात”, अशी भूमिका अबू आझमी यांनी मांडली.

“दिल्ली येणे-जाणे सुरु आहे. दिल्लीवाले काय करतील? मी अध्यक्ष आहे. माझ्याकडे एबी फॉर्म आहे. मी हवा त्याला वाटून देणार. अनुशक्ती नगर, भायखळा, वर्सोवा या ठिकाणी उमेदवार आहेत. माझे उमेदवार शरद पवारांनी मागितले तर जातील”, असं अबू आझमी म्हणाले.
‘नवाब मलिक येऊ द्या समोर, काय होतं ते बघू’

“नवाब मलिक येऊ द्या समोर, लढू द्या, काय होतं ते बघू. मायनरीटीवाले लोक, आंबेडकरवादी, आदिवासी विचारांचे लोक भाजपला मतदान करत नाहीत. मी स्वतंत्र झालो तर मी 25 उमेदवार देणार. सन्मानाने बोलू आणि विषय संपू, असं शरद पवार म्हणाले”, अशी माहिती अबू आझमी यांनी दिली.

Share This Article