वंचित बहुजन आघाडीने आपली तिसरी यादी जाहीर

0
83

मुंबई, दि. 17 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या होत्या. यानंतर आज वंचित बहुजन आघाडीने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीच प्रकाश आंबेडकर यांनी 30 उमेदवारांना संधी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यातील 48 जागांवर मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले होते. परंतु त्यांच्या एकाही उमेदवाराला निवडणुकीत यश मिळवता आहे नाही. असे असले तरी वंचितने आता विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच वंचित बहुजन आघाडीने आपल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर करत तिकीट वाटपात आघाडी घेतली होती. यानंतर वंचितने 10 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. विधानसभा निवडणुकीची तारखा जाहीर झाल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने 30 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे वंचितने एकूण 51 उमेदवारांची घोषणा केली आहे.

तिसऱ्या यादीत कोणाला मिळाली संधी?
धुळे शहर – जितेंद्र शिरसाट
सिंदखेडा – भोजासिंग तोडरसिंग रावल
उमरेड – सपना राजेंद्र मेश्राम
बल्लारपुर – सतीश मुरलीधर मालेकर
चिमुर – अरविंद आत्माराम सांदेकर
किनवट – प्रा. विजय खुपसे
नांदेड – उत्तर प्रा. डॉ. गौतम दुथडे
देगलूर – सुशील कुमार देगलूरकर
पाथरी – विठ्ठल तळेकर
परतूर-आष्टी – रामप्रसाद थोरात
घनसावंगी – कावेरीताई बळीराम खटके
जालना – डेव्हिड घुमारे
बदनापुर – सतीश खरात
देवळाली – अविनाश शिंदे
इगतपुरी – भाऊराव काशिनाथ डगळे
उल्हासनगर – डॉ. संजय गुप्ता
अणुशक्ती नगर – सतीश राजगुरू
वरळी – अमोल आनंद निकाळजे
पेण – देवेंद्र कोळी
आंबेगाव – दिपक पंचमुख
संगमनेर – अझीज अब्दुल व्होरा
राहुरी – अनिल भिकाजी जाधव
माजलगाव – शेख मंजूर चांद
लातूर शहर – विनोद खटके
तुळजापूर – डॉ. स्नेहा सोनकाटे
उस्मानाबाद – अॅड. प्रणित शामराव डिकले
परंडा – प्रविण रणबागुल
अक्कलकोट – संतोषकुमार खंडू इंगळे
माळशिरस – राज यशवंत कुमार
मिरज – विज्ञान प्रकाश माने