स्क्रू ड्राइव्हरने भोकसून रिक्षा चालकाचा खून

bpcauthor bpcauthor
1 Min Read

चिंचवड, दि. 07 (पीसीबी) : स्क्रू ड्राईव्हर भोकसून एका रिक्षा चालकाचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. 6) रात्री आठच्या सुमारास चिंचवड येथे घडली. मीर मकबूल खान (वय 34, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. या प्रकरणी दौलत मकबूल खान (वय 31) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यशवंत आत्माराम बगाडे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर खान हा चिंचवड परिसरात रिक्षा चालवत होता. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास चिंचवड येथील विजय देशी दारूच्या दुकानाशेजारी त्याचा आरोपीसोबत वाद झाला. परिसरातील नागरिकांनी त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयित आरोपीने अमीर याला स्क्रू ड्रायव्हरने भोकसले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article