मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेची विजयच्या दिशेने वाटचाल

0
9

मुंबई, दि. 27 (पीसीबी) : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सिनेट निवडणुकीत युवासेनेने खाते उघडले असून ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ 5 हजार 350 मतांनी विजयी झाले आहेत. दरम्यान युवासेनेचे पाचही उमेदवार आघाडीवर असल्याचे वरूण सरदेसाई यांनी सांगितले.

काय म्हणाले वरूण सरदेसाई? मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत राखीव पाचही जागांवर युवासेनेच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. ओबीसी गटातून मयुर पांचाळ, शेड्युल्ड ट्राईब गटातून धनराज कोचाडे, महिला गटातून स्नेहा गवळी, शेड्युल्ड कास्ट गटातून शितल शेठ, एनटी गटातून शशिकांत झोरे या पाय उमेदवारांनी जवळपास पाच-पाच हजार मते घेतली आहेत. तर आमच्या प्रतिस्पर्धी अभाविप यांच्या उमेदवारांनी 800 ते 1000 मते घेतली आहेत. असे माहिती सरदेसाई यांनी सांगितली.

भाजप, अभाविपचा रडीचा डाव

कल्पेश भोईर यांच्या विरोधात अभाविप कोर्टात गेले आहेत यावर वरूण सरदेसाई म्हणाले की, काही झाले तरी रडीचा डाव करण्याचा सरकार, भाजप, अभाविप करण्याचा प्रयत्न करत आहे. कालही त्यांनी हायकोर्टात जाऊन सिनेटच्या निकालाल स्थगिती देण्याची मागणी केली होती. पण हायकोर्टाने ती मागणी फेटाळून लावली. आज देखील थातूरमातूर केस बनवून आमच्या उमेदवाराच्या विरोधात कोर्टात गेले. पण हे प्रकरण अर्जंट नसल्याचे कोर्टाने म्हटले आणि या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दोन आठवड्यांनंतरची तारीख दिली. त्यामुळे आजचा निकाल विद्यापीठ व्यवस्थित जाहीर करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला