तात्काळ आणि महत्वाचे आंदोलन

0
102

दि.१३ (पीसीबी)आपले नेते लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज शुक्रवार दि. १३ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११:३० वा. स्थळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी, पुणे येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. या विकृत्तीविरोधात निषेध नोंदवावा अशी सूचना मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांनी दिल्या आहेत.

तरी पक्षाचे सर्व पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी मा.नगरसदस्य, महिला, युवक, एनएसयुआय, सेवादल, इंटक, सर्व सेल, विभाग, आघाडी, यांचे अध्यक्ष/अध्यक्षा व पदाधिकारी यांनी सदर आंदोलनास उपस्थित रहावे.
आपला

डॉ.कैलास महादेव कदम
अध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी