कारच्‍या धडकेत दहा वर्षीय मुलाचा मृत्‍यू

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दि ४ जुलै (पीसीबी ) – भरधाव वेगातील कारने धडक दिल्‍यामुळे दहा वर्षीय मुलाचा मृत्‍यू झाला. ही घटना कुदळवाडी, चिखली येथे मंगळवारी (दि. 2) सायंकाळी घडली.

मोहम्‍मद अफजल खान (वय 10, रा. मोरे-पाटील चौक, कुदळवाडी, चिखली) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्‍याचे वडिल कमाल अहमद मंजूर अली खान (वय 40) यांनी चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच 14/एचयू 0823) या कारवरील चालक विक्रम दादाभाऊ कसबे (वय 41, रा. श्रीराम कॉलनी, चिखली) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्‍या सुमारास फिर्यादी यांचा दहा वर्षीय मुलगा मोहम्‍मद हा मोरे पाटील चौकात रस्‍ता ओलांडत होता. त्‍यावेळी भरधाव वेगात आलेल्‍या कारने मोहम्‍मद यास जोरदार धडक दिली. तसेच त्‍याच्‍या डोक्‍यावरून चाक गेल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article