‘ईद-उल-अधा’ तथा ‘बकरी ईद’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

bpcauthor bpcauthor
1 Min Read

मुंबई, दि. १६ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना ‘ईद-उल-अधा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, शांती, त्याग, समर्पणाचे प्रतीक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, बंधुता, सौहार्दाची भावना वाढीस लागो. हा सण समाजातील गरीब, वंचित, उपेक्षितांच्या कल्याणाचा संदेश देतो. यानिमित्ताने सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या परोपकारी, उदात्त मूल्यांच्या जपणुकीचा आपण सर्वजण प्रयत्न करुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.

Share This Article