रवीना टंडन चा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल

0
280

अभिनेत्री रवीना टंडन कायम तिच्या फिटनेसनी आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. 90 च्या दशकात रवीनाने आपल्या अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं होतं. आज देखील रवीनाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर देखील रवीना आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन व्हिडीओ आणि फोटोज शेअर करताना दिसत असते. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर रवीनाचा चक्क शीवीगाळ गेल्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.

मुंबईतील वांद्रे परिसरातील रिझवी काॅलेजजवळ रात्री रवीना टंडनच्या ड्राइव्हरने कार्टर रोडवर तीन जणांना धडक दिली. दरम्यान, यावेळी वांद्रे परिसरातील काही स्थानिक लोकांकडून गाडी अडवण्यात आली. या वेळी रवीना टंडन मद्यधुंद अवस्थेत अढळली. पुढे रवीनाने गाडीतून खाली उतरुन पीडितांना शिवीगाळ आणि मारहाण केली. सध्या सोशल मीडियावर रवीनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रवीना टंडनला वांद्रे परिसरातील काही स्थानकांनी घेरलं असल्याचं दिसत आहे. घडत असलेल्या प्रकरानंतर रवीनाचा शीवीगाळ करत असतानाचा व्हिडीओ रेकाॅर्ड केला जात होता. या वेळी रवीनाने स्थानिक लोकांना माझा व्हिडीओ काढू नका, अशी विनंती केली.

रॅश ड्रायव्हिंग प्रकणावर बोलत असतना पीडीत स्थायीक मोहम्मदने आपल्या आईवर रवीनाने हात उचलल्याचं म्हटलं आहे. या वेळी बोलत असताना मोहम्मद म्हणाला की, “माझी आई, बहीण आणि भाची हे रिझवी कॉलेजजवळून जात असताना रवीनाची गाडी आईवर धावून गेली. याविषयी जेव्हा विचारलं गेलं, तेव्हा ड्राइव्हरने माझ्या भाचीला आणि आईला शिवीगाळ केली. नंतर रवीनासुद्धा कारमधून बाहेर आली आणि ती मद्यधुंद अवस्थेत होती. तिनेसुद्धा माझ्या आईवर हात उचलला. माझ्या आईच्या डोक्याला मार लागला आहे.”