बनावट कागदपत्र देऊन नोकरी लागली असे सांगत तरुणीची सहा लाखांची फसवणूक

0
95

वाकड, दि. १९ (पीसीबी) – चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देतो असे आमिष दाखवून तरुणीकडून पैसे घेतले. त्यानंतर तरुणीला बनावट कागदपत्रे देऊन त्याला नोकरी लागल्याचे सांगितले. तिच्याकडून वर्क फ्रॉम होम काम करून घेत तरुणीकडून वेळोवेळी सहा लाख रुपये घेत तिची फसवणूक करण्यात आली. ही घटना 10 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत वाकड येथे घडली.

याप्रकरणी 28 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रांत भोसले उर्फ प्रदीप भोसले, परेश पाटील उर्फ सौरभ साने, एक महिला आणि त्यांना सहाय्य करणारे इतर व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी तरुणीला चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. बॅक्सीस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हिंजवडी येथे काम करणारा आरोपी परेश पाटील उर्फ सौरभ साने याने तरुणीला कंपनीमध्ये नोकरी मिळाल्याचे बनावट कागदपत्र तयार करून ते खरे असल्याचे सांगून दिले. तरुणीला वर्क फ्रॉम होम करण्यास सांगून इतर लोकांनी आरोपींना या कटामध्ये सहकार्य केले. फिर्यादी तरुणीप्रमाणे आरोपींनी इतर मुलांची देखील फसवणूक केली आहे. या प्रकरणात आरोपींनी फिर्यादी तरुणीची सहा लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत