बस सीट वरून महिलेचे साडेचार लाखांच्या दागिन्यासह पर्स चोरीला

bpcauthor bpcauthor
1 Min Read

जेवणासाठी हॉटेलवर थांबलेल्या बस मधून महिलेची साडे चार लाख रुपयांच्या दागिन्यांसह पर्स चोरीला गेली आहे.ही घटना रविवारी (दि.12) रात्री ताथवडे येथे घडली आहे.

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुंबईवरून सांगलीला एका खाजगी ट्रॅव्हल्स ने निघाल्या होत्या. यावेळी ताथवडे येथे एका हॉटेलवर बस जेवणासाठी थांबली. फिर्यादी यांनी त्यांची पर्स त्यांच्या सीटवर ठेवली होती. त्या वापस परत आल्या असता तिथून त्यांची पर चोरीला गेली होती. पर्समध्ये 4 लाख 43 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. यावरून वाकड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Share This Article