पुणे शहरातील एका नामांकित अभियांत्रिक महाविद्यालयाचे वस्तीगृहात राहत असलेल्या तरुणीने तिच्या साेबत राहणाऱ्या तीन मैत्रिणींचे नकळत कपडे बदलतानाचे आक्षेपार्ह फाेटाे काढून ते तिच्या प्रियकरास पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पिडित तरुणींनी महाविद्यालय प्रशासनाला माहिती दिल्यावर याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आराेपी तरुणी व तिचा प्रियकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनीत अजित सुराणा (सध्या रा.हिंजवडी,पुणे) या आराेपीवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.