तरुण आणि तरुणी यांना चटपटीत खायला फार आवडतं. काही लोकांना गाड्यांवरचे खाद्यपदार्थ चविष्ट लागतात. तर काहीजण ठराविक ठिकाणी जाऊन त्यांच्या आवडीचे खाद्य खाताना दिसत असतात. मात्र, आपल्याचं आवडीचे पदार्थ खाताना काळजी घेण महत्त्वाचं आहे. यामध्ये वापर करत असलेल्या गोष्टी खराब आहेत की चांगल्या हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण यामुळे तुम्हाला विषबाधा होऊ शकते. असाच काहीसा धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडला आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
प्रथमेश हा तरुण मानखुर्द येथील महाराष्ट् नगरमध्ये राहत होता. दरम्यान, प्रथमेश त्यांच्या येथील शाॅरमा स्टाॅलवर शाॅरमा खायला गेला होता. शाॅरमा खाल्यानंतर प्रथमेशला त्रास होऊ लागला. एवढंच नाही तर त्या ठिकाणी इतर दहा ते बारा जणांना देखील त्रास सुरु झाला. शाॅरमा खालेल्या लोकांना उलट्यांचा त्रास झाला, तसेच पोट सुद्धा बिघडल्याचं पाहायला मिळालं.
शाॅरमामुळे गमावला प्राण-
प्रथमेशला त्रास होऊ लागल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रथमेष याच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू होताच शॉरमा विक्रेत्याविरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल-
शाॅरमाचे विक्रिती करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा असे आरोपींची नावे आहेत. शाॅरमासाठी लागमारे मांस कुठून आणले याची पोलिस सध्या चौकशी करत आहेत. शॉरमातील चिकन खराब असल्याचा पोलिसांना संशय आहे. हा खराब शॉरमा खाल्ल्याने प्रथमेश भोकसे याचा मृत्यू झाला आहे.