गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
234

दि ३० एप्रिल (पीसीबी ) – बेकायदेशीरपणे गावठी कट्टा जवळ बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 29) सायंकाळी काळाखडक, वाकड येथे करण्यात आली.

तेजस रेवण जगताप (वय 23, रा. काळाखडक, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार महंमद गौस नदाफ यांनी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळाखडक येथे एकजण गावठी कट्टा घेऊन आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन तेजस जगताप याला अटक केली. त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.