पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे निधन

0
203

दि २७ एप्रिल (पीसीबी ) पुणेः पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने झालं निधन झालं आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मोहनसिंग राजपाल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पुण्याचे महापौर झाले होते. २०१० ते २०१२ या कालावधीत त्यांनी पुण्याचे महापौर पद भूषवले. पुण्याचे पहिले शिख महापौर अशी त्यांची वेगळी ओळख होती.
मोहनसिंग राजपाल हे गेले महिन्यांपासून आजारी होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.