तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती

0
227

दि २७ एप्रिल (पीसीबी ) – मीरा रोड मध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिची अश्लील छायाचित्रे काढून तिच्या कडून लाखो रुपये उकळण्यात आहे होते. तसेच तिचे केस काढून तिला विद्रुप करण्यात आले होते. याप्रकरणी नया नगर पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

पीडित तरुणी २६ वर्षांची आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये तिची ओळख कल्याण मध्ये राहणाऱ्या मोहसीन शेख (२२) याच्या सोबत झाली होती. तिने नया नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार मोहसीन याने तिला गुंगीकारक पदार्थ टाकून बिर्याणी खायला दिली होती. यानंतर पीडित तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर मोहसीन याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची अश्लील छायाचित्रे काढली.यानंतर तो तिच्याशी वारंवार बळजबरी करून शरीरसंबंध प्रस्थापित करत होता. यानंतर तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्याची सक्ती करू लागला. तिने नकार दिल्यावर सतत तिला मारहाण करू लागला. तिच्या डोक्यावरील केसही काढून विद्रुप केले होते. तिच्याकडून पावणे तीन लाख रुपये देखील उकळले, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे.

आरोपी मोहसीन शेख याचे भाऊ जाफर, मोबिन, मेव्हणा अश्फाक शेख, यांनी तिचा विनयभंग केला होता. काका इम्रान बागवान याने तिला मारहाण केली. आरोपी मोहसीन याची आई शहनाज हिने देखील इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले, अशी तक्रार पीडितेने तक्रारीत केली आहे. या तक्रारी वरून नया नगर पोलिसांनी ६ जणांविरोधात फसवून, बलात्कार, विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.